कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच

Published 2024-07-01
कढीपत्ता चटणी / CURRY LEAVES CHUTNEY

पावसाळ्यात हिरवागार कढीपत्ता अगदी मुबलक व ताजा मिळतो. कढीपत्ता हा तब्येतीसाठी अतिउत्तम. त्या मुळे ही खमंग कढीपत्ता चटणी खास तुमच्यासाठी जिचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो जसा की चटणीत तेल, तूप किंवा दही घालून जेवणाच्या पानात डावीकडचा पदार्थ म्हणून छान लागते चटणी. तसच इडली डोसा, उत्तपा ह्यावर आणि गरमा गरम बटर लावलेल्या टोस्टवर अप्रतीम लागते. अशी चटणी असेल की आपली ब्रेकफास्ट किंवा तोंडीलावण्याची चिंता मिटते. ह्या चटणी पोळीचा रोल टिफीन मधे द्यायला पण अगदी योग्य. मुख्य म्हणजे कढीपत्ता खाल्ला जातो.

तर अशी सुवासिक कढीपत्ता चटणी रेसिपी आवडली असेल तर एक 'लाईक' होऊन जाऊदे की. तसच चॅनल शेअर व सबस्क्राईब करून तुमचे प्रोत्साहन मिळाले तर फारच मस्त आणि नेहमीप्रमाणे कॉमेंट लिहायला विसरु नका.

धन्यवाद 🙏


३ मूठ कढीपत्ता

३ मोठे टेस्पून (७० ग्रॅम) हरबरा डाळ

४ मोठे टेस्पून (८० ग्रॅम) उडीद डाळ

४ मोठे टेस्पून (८० ग्रॅम) दाणे

५-६ सुक्या लाल मिरच्या

१ टेस्पून (१० gm) तिळ

१ मोठा टेस्पून तिखट

१ टेस्पून जिर किंवा १ टेस्पून भाजलेली जिरा पावडर

२ मोठे टेस्पून (२० gm) सुक किसलेले खोबर (२० gm)

१ मूठ (२० पाकळी) लसूण

मीठ चवीप्रमाणे

डाळी तळण्यासाठी तेल

—-----------------------------------------------------------------------

INGREDIENTS:
3 handfuls of curry leaves
3 large tbsp (70g) split gram
4 large tbsp (80 gms) urad dal
4 large tbsp (80 grams) peanuts
5-6 dry red chillies
1 tbsp (10 gm) sesame seeds
1 big tbsp chilli powder
1 tbsp cumin seeds or roasted cumin powder
2 tbsp (20 gm) dry grated coconut
1 handful (20 cloves) garlic
Salt to taste
Oil for frying pulses

#कढीपत्ताचटणी, #चटणीकढीपत्याची, #कढीपत्ताचुरचुरीतकसाकरायचा, #हिरवीचटणी, #कढीपत्तेकीचटनी, #कैसेबनाएकढीपत्तेकीचटनी, #महाराष्ट्रीयनचटणी, #curryleaveschutney, #howtomakecurryleaveschurney, #spicycurryleaves, #curryleaves, #कढीपत्ता, #cookwithoutabook, #कूकविदाऊटअबुक

All Comments (21)
  • @PravinaTure-r8c
    किती छान.आणि chavistchatani ही.अवश्य करून पाहीन.
  • चटणी बघायलाच छान वाटली. यात घरात बनवलेले साजूक तूप घालून गरम गरम पोळीला लावून आणि पोळीचा रोल करून खायला खुपचं मजा वाटेल. कारण चटणीची आणि घरातल्या तुपाची चव आणि स्वाद एकत्र आला तर ब्रम्हानंद होईल . मस्त
  • So very nice way of narrating. It appeals to mind very quickly. Thanks for a wonderful chutney.
  • Khoop chhan recipe aahe,Kadhipatta chatani vegalya padhatine keli aahe,Thanks Madam😊😊
  • मी अशी चटणी केली. घरातल्या सर्वांना मैत्रिणींना खूप आवडली. आता अशी चटणी घरात नेहमी हवीच.
  • @user-hr6qx2zs3t
    खुप छान चटनी मालती येनपुरे
  • शेंगदाणे आधी तळून घ्यावेत.मग बाकीचे सर्व तळावे..खूप छान रेसिपी सांगितली.
  • @MangalaBhate
    चटणी ची. पध्दत फारच छान आहे
  • @sujatababar7645
    चटणी खमंग व हिरवीगार ,खूप छान !!! 🎉🎉
  • मी अशा चटणी च्या रेसीपी च्या शोधात होते फारच सुंदर पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद
  • @neetajadhav8793
    खुपच सुंदर पद्धत आहे करायला अगदी सहज 🎉