Gavakadchi vat,मिरचीचा खर्डा,ठेचा ,मिरचु

Published 2019-01-07

All Comments (21)
  • मी पंढरपूर जवळ तावशी या गावचा आहे. सध्या मी जॉब निमित्ताने लंडन, इंग्लंड मध्ये राहतो. मला तुमचे विडिओ खूप आवडतात. एकदम गावाकडं खाल्लेल्या भाज्यांची आठवण येते.माझी आजी चिगळेची भाजी खूप छान करते. मी गावी गेलो कि आवर्जुन आजी माझी शेतात जाऊन ती भाजी गोळा करते आणि आणते खास आमच्यासाठी. परत कडवंची नावाचा पण एक प्रकार आहे. तुम्हाला माहित पण असेल कदाचित. त्याची पण भाजी खूप छान लागते. असेच छान छान videos बनवत राहा. आणि अपलोड करत राहा thanks
  • बहुत ही सुन्दर चटनी, बनाने का तरीका और जीवन सब कुछ शानदार👍
  • @rakeshsasane355
    वा दादा वा मस्तच आहे रेसिपी तोंडाला पाणीच सुटायला पाहिजे वा 👍👌
  • भाऊ तुम्ही खूप चांगल्या रितीने निसर्गाच्या सान्निध्यात राहून आयुष्याचा आनंद घेत आहात. अस्सल गावातली माणसं आणि तुमची गावरान भाजी रेसिपी पाहून हेवा वाटतो. मस्तच आणि खूप खूप धन्यवाद.
  • तुमचं रेसिपी करताना च जे संभाषण आहे ते खूप आपुलकी च आहे , खूप छान जोडी, उत्तम उद्देश, सुंदर काम, शुभेच्छा!!!👌
  • भाऊ लय आवडल आपल्याला चुलीवरच गावरण खरडा एवढा स्वयंपाक होइ पर्यंत ताइच्या डोक्यावरचा पदर पडला नाही लई आदर वाटतो आपला
  • सर तुमच्या पत्नी नि जे बोलले की फ्रिज मधील खाऊ नये हे अगदी खर आहे कारण जुन्या काळात कुठे होता फ्रिज ह्या फ्रिज मुळे लोकांना आजाराचे प्रमाण वाढले.सलाम आहे तुमच्या ह्या च्यायणल ला.
  • @Anitakanekar
    मस्त चान वाटल.... गावा कडची भाकरी आणि ठेचा कांदा आणि गाजर सोबत.... Wowww😍
  • Hamari favorite mirchi ki chatni jawari ki roti,,, qismat Wale h aap jo itna fresh shudh khate h, love you Bhau and Vahini
  • खूप subscribers मिळतील तुम्हाला, 100%, साऊथ च्या village food चॅनल सारख टिकून राहा.... अस्सल गावरान रेसिपी टाकत राहा...भाषेतला आणि वेशभूषेचा साधेपणा अस्सल पण टिकवून ठेवा,, विडिओ साधी सरळ असू द्या नेहमी... शुभेच्छा खूप तुम्हाला
  • @sachinlad6643
    खूपच छान, शेतावरील चुलीवरची भाकर आणि खर्डा, लय भारी, चंगळ वादाचा कितीही मोठेपणा केला तरी नैसर्गिक साधेपणाच भावतो हे मात्र नक्की..
  • @peaceliving7584
    तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघितलंय, अप्रतिम चव आहे. फक्त तुमच्यासारखी चुलीवर नाही जमलं . ती चव एकदा चाखायची आहे......गावाकडे गेल्यावर हट्टाने करून खाणार आहे चुलीवर. तुम्ही जे निवेदन करताना आयुर्वेदिक महत्व सांगता ते फार छान असतं. मला आणि घरातल्या सर्वाना खूप आवडतं. अजून गावरान जेवण् बनवण्याचा पद्धती टाकाव्यात. खूप शुभेच्छा तुम्हाला .
  • सहज आणि नैसर्गिक वाटलं. खूप छान
  • @r.m.durrani3761
    भाऊ खर्डा एकदम मस्त ! कानात टाकायचं जे घरगुती औषध तुम्ही सांगितलंत , त्यात ते तेल थंड होऊ द्या असं आवर्जुन सांगा .नाहीतर आजकालच्या मुली ओततील गरमगरमच 😉😉
  • @technosavy1395
    मी सकाळपासून 5-6 विडिओ पहिले ठेच्याचे... पण हीच खरी ठेचा बनवण्याची पद्धत आहे. कमी तेलात बनवलेला...लसूण न तळलेला.. झणझणीत ठेचा... मला हा विडिओ खूप आवडला.माझी आई सुद्धा असाच ठेचा बनवते
  • @kishorpatil8348
    खूपच छान भाऊ 👌👍 गावाकडची आदर्श कुटुंब पद्धतीचे संस्कार , स्वयंपाक केला पॅन माऊलीच्या डोक्यावरचा पदर नाही खाली पडला याला म्हणतात संस्कार आणि अशा संस्कारातून तयार झालेले अन्न नक्कीच अमृतासाम
  • @babulalbhoi1235
    रेसिपी सुरु असतांना त्यातील बाबींचे औषधी व इतर गुणधर्म ही आपण सांगतात. खुप छान पद्धत आहे भऊ व ताई , धन्यवाद! 🙏🙏
  • @sandeepkpdxb
    Very nice. I love thecha. Actual way of making it. Superb👍
  • खुपच छान खूप च सुंदर झक्कास मिर्ची चा खर्डा झाला असून तो अप्रतिम झाला आहे राव शुभ सकाळ राव !!!!!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!❤❤❤❤❤#❤❤❤❤❤☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆#❤
  • @lahushelke8425
    खर्डा खूप छान केला आहे आणि आम्ही पण घरी बनवला तो ही खूप छान झाला आणि ताईच आणि तुमचं bonding असच रहुद्या जे तुम्ही केलं आहे ते खूप छान केलं आणि असच आम्हाला आणखीन रेसिपी दाखवत रहा