आकाश ठोसर सोबत अनुभवला जंगलाचा थरार🥵 |किल्ले कमळगड |घनदाट जंगलाने वेढलेला 😰| Kamalgad Fort | Satara

657,806
0
Published 2023-08-26
सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून बनवण्यात आला आहे ..
कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.

►YouTube - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho prashil

► Youtube - youtube.com/channel/UC6fOaVgA...
► Facebook -www.facebook.com/prashil.amba...
► Instagram - instagram.com/prashilambade
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.

महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते

छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

१) महाबळेश्वरहून :-
महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावी पोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत आपण कमळगडावर पोहचतो.
२) वाईहून :-
वाईहून नांदगणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
३) इतर गावांतूनः-
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावी वाईहून एस.टी. बसने येता येते.
वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्‍या दिशेने चढण्यास सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.

वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने तसेच वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे.

राहण्याची सोय
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.

जेवणाची सोय
पाण्याची सोय : गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आhe.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
#kamalgad #celebrity #satara #trending #jungle #trekking #hiking #sairat

All Comments (21)
  • @indianfirasti
    ते शिवलिंग माझ्या वडिलांनी कोरलेले आहे. ते पुसट दिसत होते आधी,मग आम्ही नंतर त्यावर कोरीव काम करुन मुक्त केले आहे.
  • @BlackHeartBN
    कमळगड किल्ला आणि अशक्य सुंदर सह्याद्री कोणा कोणाला आवडले👍😘
  • @ravirajghardale
    भाऊ तुमच्या दोघांची जोडी झाली काय भारी काम झाले..... प्रसिल भाऊ तुला नक्की आकाश एखाद्या मराठी चित्रपटात घेणार मी 100% सांगतो....आकाश जस चित्रपटात आहे तसाच रिअल आयुष्यात आहे अस वाटत चित्रपट पाहतोय
  • @mayuragre5585
    खुप छान सुंदर कमळगड .. आणि तु ज्या प्रकारे गडाच वर्णन करतो ते ऐकून तर प्रसन्न वाटतं....🎉 सलाम आपल्या जिद्दीला.... जय शिवराय ⛳⛳⛳🎯
  • @shivajipiwal4004
    आकाश भाऊला पण गडकोट भटकंतीची आवड आहे हे बघून आनंद वाटला.
  • @supportsystem07
    छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🧡🧡🧡
  • @pratikwadkar1841
    दादा तू या कमळगड गडावर आला खुप मस्त मस्त वाटलं कारण मी पण वाई चा आहे तुझे मनापासून आभार आणि तुझे प्रत्येक व्हिडिओ मी बघतो तू प्रत्येक ट्रेक ची मस्त माहिती देतो दादा तू अजून रायरेश्वर आणि प्रतापगड ला पण ट्रेक करशील याची मला मनापासून ईच्छा आहे. दादा जय शिवशंभू 🚩🚩👑
  • @bluediamond6866
    सैराट 2 मध्ये आकाश ठोसर चे जिगरी मित्र म्हणून प्रशील योग्य होईल अस मला वाटत. तुम्हला ही संकल्पना आवडली तर नक्की लाईल करा.
  • Prashil dada tu bhari ahesch ..but Akash jya jiddine aani aavdine tuza sobat trekking krtoy te pahun khup chan vatt ..very down to earth personality Akashthosar ❤ and he enjoyed it
  • @meghanadere7731
    पूर्ण vedio मस्त आहे .. एकदम बारीक निरीक्षण आणि छान वातावरण 🍃🌫️... शेवटी महाराजांची गर्जना अंगावर काटा आणते 👌🚩♥️....जय जिजाऊ जय शिवराय 🚩♥️🙏🏼
  • @govindborkar9191
    प्रशिलभाऊ आपण आकाश ठोसर सरांना सोबत घेऊन कमळगडावरील श्री.गोरक्षनाथांच्या चरणांचे दर्शन घडविले आहे तसेच गडावरील घर दगडाची उत्कृष्ट माहीती दिली आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
  • @Funny_game184
    आकाश दा सोबत चालताना त्याच्या lifestyle विषयी पण जाणून घे ते ही लोकांना बगायला आवडेल
  • @Patil229
    धन्यवाद prashil दादा तुमच्यामुळे आम्हाला किल्ले बघण्यास मिळतात ❤❤
  • @Aniruddhacreations
    17:46 Prashil dada , त्या हिरव्या fungus la मराठीत मार्गात म्हणतात , घातात ह्या fungus ला गणपती बाप्पा च्या decoretion साठी ही वापरतात .आपल्या सैयाद्रीत असल्या खूप घाड सापडतात झे जास्त कोणाला माहित नाहीत ❤️ . जय जिजावू जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
  • मी वासोळे गावची आहे कमळगडला जाण्याचा रस्ता आमच्या गावात आहे मला अभिमान आहे मी की मी महाराजांच्या मातीत वाढलेली आहे
  • @RM34098
    आकाश ठोसर आपले छंद जोपासतो खूप छान,आणि त्यात गड किल्यावर जातोय खूप छान
  • Prashil तुझ्या बरोबर सेलिब्रिटी आल्यावर त्यांच्या बरोबर एक छोटासा interview घेत जा.
  • @BalajiRaut353
    जे किल्ले आम्हाला माहित नाही ते किल्ले आम्हाला घरी बसून माहित होय लागलेत ❤ Thank you so much एवढी माहिती देत अहोस
  • @VanrajJadhav-uf5if
    मी हा गड 7 वर्षा पूर्वी पाहिलेला आज तुझा हा कमळगड चा व्हिडिओ पाहून आठवणी ताज्या झाल्या.thanks प्रशिल
  • @sunilshivtare1284
    खुप घनदाट आणि खुप मोठा जंगल trek आहे मी चार वेळा कंप्लेट केला आहे कमळगड